प्रतिनिधी / खेड
कोकण मार्गावर एकामागोमाग एक साप्ताहिक फेस्टिवल स्पेशल गाड्यांची घोषणा होत असल्याने कोकणातील प्रवाशांना दिलासा मिळत आहे. शनिवारपासून धावणाऱ्या ‘मुंबई-मडगाव’ फेस्टिवल स्पेशल पाठोपाठ २६ ऑक्टोबरपासून ‘गांधीधाम-तिरूनवेल्ली’ साप्ताहिक फेस्टिवल गाडी धावणार असून या गाडीला कोकण मार्गावर पनवेल व रत्नागिरी येथे थांबा देण्यात आला आहे.
ही साप्ताहिक फेस्टिवल स्पेशल गाडी २६ ऑक्टोबर रोजी गांधीधाम येथून सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता तिरूनवेल्लीला पोहचेल. परतीच्या प्रवासात २९ रोजी तिरूनवेल्ली येथून सकाळी ७.४५ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता गांधीधाम येथे पोहचेल. २२ डब्यांची ही स्पेशल गाडी अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वसई रोड, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, कारवार, मंगलोर, कोझिकोडे, शोरनूर, थिस्सूर, एर्नाकुलम, कयमतुलम, तिरुअनंतपुरम आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.