कोरोनाच्या लढ्यात महेश पालकर यांची स्वयंपेरणेने उडी
प्रतिनिधी / खेड
कोरोनाच्या लढ्यात पशासकीय यंत्रणांसह आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहेत. याच लढ्यात तालुक्यातील खारी येथील महेश उर्प राजेश पालकर यांनीही उडी घेत स्वतच्या राहत्या घरात 12 कोरोना रूग्णांसाठी विलगीकरण केंद्र बनवत एक आदर्श निर्माण केला आहे. ते स्वत दुसऱया घरी राहण्यास जाऊन दररोज आरोग्य सेवक-सेविकांशी संपर्प साधून रूग्णांची विचारपूस करताना औषधांसह इतर बाबींकडेही जातीने लक्ष देत आहेत.
सद्यस्थितीत या विलगीकरण केंद्रात 11 रूग्ण आहेत. पत्येक वाडीवस्तीवर जावून लोकांची चाचणी करून कोरोनाच्या संकटातून गावाला पूर्णपणे बाहेर काढण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. यासाठी खाडीपट्टा शिवराज्य ग्रुपचीही निर्मिती केली असून याद्वारे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत व्यापक स्वरूपात कोरोना जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.