प्रतिनिधी / गुहागर
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर 3 जून ते 9 जून या कालावधीत जाहीर करण्यात आलेल्या संपूर्ण लॉक डाऊन मध्ये गुहागर तालुक्यात पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनामध्ये पाच ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली तर गस्ती करिता सहा पथके तैनात करून चारचाकी व दुचाकी वरून गस्त घालण्यात येत होती शुंगार तळीमध्ये केलेल्या नाकाबंदी मध्ये 28 जणांवर मोटर व्हेईकलचे कारवाई करत रुपये सात हजार दंड वसुली करण्यात आली पाच जणांचे आरटीपीसीआर नसल्याने प्रत्येकी एक हजार प्रमाणे दंडाची कारवाई करण्यात आली तर विनामास्क फिरणाऱ्या तिघांवर प्रत्येकी रुपये पाचशे प्रमाणे कारवाई करण्यात आली.
तालुक्यातील सर्व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला होता तरीही कोणत्या ना कोणत्या कारणाने दुचाकी व चारचाकी वरून फिरणार यांवर गुहागर पोलिसांनी कारवाई केली.