प्रतिनिधी / चिपळूण
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व साप्ताहिक गोळीबारचे संपादक श्रीकृष्ण खेडेकर यांचे शुक्रवार दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. गतवर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाची परिस्थिती असतानाच त्यांचे लहान भाऊ दिलीप खेडेकर यांचे निधन झाले होते. त्यापाठोपाठ ही घटना घडल्याने खेडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
गेली अनेक वर्षे श्रीकृष्ण खेडेकर हे बांधकाम व्यावसायीक म्हणून कार्यरत होते. सलग 10 वर्षे ते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. याशिवाय वैश्य समाजाचे जिल्हा सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहीले होते. वैश्यवाणी नागरी पतसंस्था स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, मोठा भाऊ, सुना नातवंडे असा परिवार आहे.