प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालय येथे नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचा उद्घटन कार्यकम 4 एपिल रोजी पार पडणार आह़े. या इमारातीच्या बांधकामाला एकूण 20 कोटी रूपये खर्च आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात आले आह़े. नुकतेच बांधकाम विभागाने ही इमारत बांधून न्यायालय प्रशासनाकडे सुपूर्त केली आह़े.
रत्नागिरी येथे न्यायालयाचे वाढते कामकाज पाहता नवीन इमारत बांधणे अत्यावश्यक झाले होत़े, त्यासाठी न्यायालय प्रशासनाने पुढाकर घेवून नवीन इमारत बांधण्यासाठीचा प्रस्ताव शासनापुढे ठेवला होत़ा. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाला सुसज्ज अशी इमारत बांधण्यास सांगण्यात आले होत़े. नुकतेच या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आह़े. नवीन इमारतीला तळमजला, अधिक दोन माळे व बेसमेंट ठेवण्यात आला आह़े.