रत्नागिरी / प्रतिनिधी :
दुबईहून परतलेला एक पन्नास वर्षे वयाचा वृद्ध ताप-सर्दीसदृश्य लक्षणे आढळल्याने स्वतःहून जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झाला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातून पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच अन्य संशयितांची संख्या आठवर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणाच रत्नागिरीत हायअलर्ट झाली आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ, हॉटेल, धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी तात्काळ घेतला आहे.केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत.