प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असताना आज केवळ १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. विशेष म्हणजे आज एकाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८५१६वर पोहोचली आहे. आज १३ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ८०३८वर पोहोचली आहे.
आरटीपीसीआर
लांजा २
एकूण २
अँटीजेन
दापोली १
संगमेश्वर ५
रत्नागिरी २
एकूण ८