प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्हयात अॅन्टीजेन चाचणीत 64 तर आरटीपीसीआर चाचणीत 9 असे एकूण 73 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3018 इतकी झाली. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 8, कामथे,चिपळूण १, समाजकल्याण रत्नागिरी ६, घरडा, लवेल, खेड ३ येथे उपचार घेत असताना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1865 झाली आहे.
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 9
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 28
दापोली – 22
संगमेश्वर – 1
घरडा रुग्णालय – 13
एकूण 9 + 64 = 73 पॉझिटिव्ह रुग्ण
आज पाली, रत्नागिरी येथील 40 वर्षीय कोरोना रुग्णाचा तसेच काजुरी, ता. गुहागर येथील 42 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता 107 झाली आहे.
तालुकानिहाय मृतांची संख्या खालीलप्रमाणे
रत्नागिरी – 35
खेड – 12
गुहागर – 4
दापोली – 20
चिपळूण – 18
संगमेश्वर – 8
लांजा – 2
राजापूर – 7
मंडणगड – 1
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 3018
बरे झालेले – 1865
मृत्यू – 107
उपचारात – 1046