रत्नागिरी/ प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात एकाचवेळी 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या सर्व जणांना कॉरोंटाईन करून ठेवण्यात आले होते. एकाचवेळी एकाच तालुक्यातून 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. तर खेड तालु्क्यातील कळंबणी येथे 2 नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आज एकूण 13 नवे रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात एकाच वेळी एवढे रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.