प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 22 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे जिह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8 हजार 341 झाली आहे. खेडमधील एका 75 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 311 झाली आहे. तर रुग्णालयातून 43 जणांना घरी सोडण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 15 रुग्ण रॅपिड अँटिजेन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच 7 आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये खेड 2, चिपळूण 10, रत्नागिरी 8, मंडणगड 1 तर दापोली 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात मृत्यूदर अद्यापही 3.73 टक्के आहे. जिल्ह्यात आजपर्यंत मृतांची संख्या रत्नागिरी 83, खेड 50, गुहागर 12, दापोली 32, चिपळूण 74, संगमेश्वर 32, लांजा 11, राजापूर 14, मंडणगड 3 अशी आहे. तर बरे होणाऱया रुग्णांची टक्केवारी 92.54 टक्के इतकी आहे. सध्या 311 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर बरे झालेल्याची संख्या