प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यात 31 मे रोजी मृत्यू झालेल्या त्या व्यक्तीचा कोरोना अहवाल काल,सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 10 झाली आहे.
सोमवारी रात्री प्राप्त झालेल्या आलेल्या अहवालात आणखी 10 रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 297 झाली आहे. यातील 9 रुग्ण संगमेश्वर येथील रुग्णालयात दाखल आहेत तर एका रुग्णाचा मृत्यू पश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 116 झाली आहे. ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 171 आहे.