पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
पूर्व उच्च प्राथमिक पाचवी आणि पूर्व माध्यमिक आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाला. इयत्ता पाचवीच्या व आठवीच्या राज्य गुणवत्ता यादीत जिल्हय़ातील 18 विद्यार्थी झळकले आहेत. 8 वी च्या शहरी विभागात जिल्हय़ातील एकही विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकला नाही. आठवीच्या शहरी विभागात रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेची विद्यार्थिनी ईशा संदेश रहाटे 86. 57 टक्के गुण मिळवून जिल्ह्य़ात अव्वल ठरली आहे.
जुलै 2022 मध्ये पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा जिह्यात विविध केंद्रावर घेण्यात आली होती. जिल्ह्य़ातून इयत्ता पाचवीसाठी 8 हजार 158 विद्यार्थी तर आठवीसाठी 4 हजार 10 विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. पाचवीसाठी नोंदणी केलेल्या 4 हजार 193 पैकी परीक्षा देणाऱयांमध्ये 2 हजार 996 मराठी माध्यम, 285 उर्दू आणि 729 इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी होते. आठवीमध्ये नोंदणीकृत 8 हजार 506 विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्ष परीक्षेला बसलेल्यांमध्ये 6 हजार 724 मराठी, 408 उर्दू आणि 926 इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी होते.
इ. 5 वी व इ. 8 वी या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये खेड तालुक्यातील 11 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले. यामध्ये ज्ञानदिप विद्यामंदिर भडगावचे 8 विद्यार्थी तर ज्ञानदिप विद्यामंदिर मोरवंडेच्या 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूलचे 35 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत तर 2 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद डोर्ले मराठी शाळेचा केतन संदीप मांडवकर या विद्यार्थ्याने इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 298 पैकी 276 गुण मिळवून रत्नागिरी जिह्यात 2 रा क्रमांक प्राप्त केला.
@बॉक्स करणे….
‘ईशा अष्टपैलू विद्यार्थिनी’
जिल्ह्य़ात इ. 8 वीमध्ये शहरी विभागात प्रथम आलेल्या ईशा रहाटे ही अभ्यासाबरोबरच इतर विषयांमध्ये अग्रेसर आहे. यावर्षी एनसीसीच्या एटीसी कॅम्पमध्ये ती बेस्ट कॅडेट ठरली. तसेच प्रश्नमंजुषा व एकल गायन प्रकारात रौप्यपदक मिळवले आहे. एनसीआरटी आयोजित राज्य कला व उत्सवामध्ये तिने पारंपरिक गायन प्रकारात जिल्हय़ात प्रथम क्रमांक पटकावला. दरम्यान, अभ्यासाबरोबरच गायन, हस्तकला, वाचन, नृत्य हे तिचे छंद आहेत.
चौकट 2
राज्य गुणवत्ता यादीत झळकलेले रत्नागिरी जिल्ह्य़ातील विद्यार्थीः
@इ. 5 वी
(शहरी भाग) विद्यार्थीः
मधुरा संजय पाटील (7 वा क्रमांक- पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी)
आदित्य महेश दामले (8 वा क्रमांक – पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी)
अर्शती समीर कारेकर (9 वा क्रमांक – दामले विद्यालय, रत्नागिरी)
दुर्वा भालचंद्र बोडस (9 वा क्रमांक – जि.प. शाळा क्रं. 5 लांजा)
(ग्रामीण विभाग) विद्यार्थीः
अथर्व सतीश झगडे ( 4 था क्रमांक- ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगांव खेड)
अजिंक्य हरि मेटकरी (4 था क्रमांक-जि. प. शाळा क्र. 4, कोकरे )
लोकेश विलास सौंदळकर (5 वा क्रमांक-जि. प. शाळा क्र. 3 ओणी, राजापूर)
मयुरेश कारभारी वाडेकर (6 वा क्रमांक-जि.प. शाळा क्र. 1, उमरे)
अर्णव राजकुमार मगदुम (7 वा क्रमांक-ज्ञानदीप विद्यामंदिर, भडगाव)
@इ. 8 वी मधील विद्यार्थी (ग्रामीण)
राधिका अमित रांगडे (7 वा क्रमांक-ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, खेड)
सुयश मोहन सोनवणे (9 वा क्रमांक -ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, खेड)
वेदिका गणोजी माने (9 वा क्रमांक –ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, खेड)
आर्य संतोष भोईर (11 वा क्रमांक- ज्ञानदीप विद्यामंदिर मोरवंडे, खेड)
पार्थ सुनील मनवल (11 वा क्रमांक-ज्ञानदीप विद्यामंदिर मोरवंडे, खेड)
अन्वय प्रमोद कांबळे (12 वा क्रमांक-ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, खेड)
सायली राजेंद्र भालेराव (12 वा क्रमांक-ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, खेड)
यश संतोष कांबळे (12 वा क्रमांक-ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव, खेड)
पांशुल काशिराम बावधने (13 वा क्रमांक-ज्ञानदीप विद्यामंदिर मोरवंडे, खेड)
भडगाव ज्ञानदीपचे 57 विद्यार्थी गुणवत्ता यादीत
खेड ः भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिरमधील इ. 5 वीतील 19 तर इ. 8 वीतील 38 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले. इ. 5 वीतील चौघे राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत तर 15 जिल्हा गुणवत्ता यादीत तर इ. 8 वीतील 7 राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत तर 28 जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले.