प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मागील 24 तासात जिह्यात 46 नवे रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. 46 पैकी 21 जण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 25 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. शनिवारी जिह्यात 116 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते तर रविवारी 46 रुग्ण सापडले असून दोन दिवसात 162 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा चिंताजनक असून शनिवारी जिह्यात 116 नव्या रुग्णांची भर पडली होती. तर रविवारी 46 नवे रुग्ण सापडले. यामुळे आता जिह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10,779 वर जाऊन पोहचली आहे. शनिवारी आलेल्या अहवालात 21 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 25 रुग्ण ऍन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. मागील चोवीस तासात 693 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत 97 हजार 257 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 17 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 9 हजार 968 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा बळी गेला नसून जिह्यात कोरोना बळींची संख्या 372 इतकी आहे. जिह्यात कोरोना रिकव्हरी रेट 92.47 टक्के आहे.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील सर्वच तालुक्यात कोरोनाचे संक्रमण झाले आहे. नव्याने सापडलेल्या 46 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 14, खेड 1, चिपळूण 18, मंडणगड 2, राजापूर 6, लांजा 1 आणि संगमेश्वर तालुक्यात 4 रुग्ण सापडले आहे. जिह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 9.93टक्के आहे.