प्रतिनिधी / रत्नागिरी
जिह्यात कोराना रूग्णांचे संख्येत सातत्याने घट होताना दिसून येत आहे. सोमवारी करण्यात आलेल्या 85 काराना चाचण्यांमध्ये केवळ 8 रूग्ण आढळून आले आहेत. जिह्यातील एकूण रूग्णसंख्या 8 हजार 375 इतकी झाली आह़े तर सोमवारी कारोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी कारोनापासून बरे झालेल्या 8 रूग्णांना घरी सोडण्यात आले. यामुळे कारोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 7 हजार 742 इतकी झाली आहे. तर जिह्यातील बरे होण्याचे पमाण आता 93.26 वर गेले आह़े नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये आरटीपीसीआर टेस्टमध्ये 5 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 3 कारोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये रत्नागिरी 5, चिपळूण 1, गुहागर 2, अशी तालुकानिहाय आकडेवारी आहे.
एकूण रूग्ण-8383
नवे रूग्ण -08
नवे मृत्यू -00
एकूण मृत्यू -313