मेघगर्जनेसह सरी, ढगाळ वातावरणाचा बळीराजाला तडाखा, लांजासह चिपळुणात गारांचा वर्षाव
प्रतिनिधी / रत्नागिरी
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे गुरुवारी जिह्यात पावसाने हजेरी लावली. चिपळूण, खेडसह लांजा, संगमेश्वर व साखरपा परिसरात पावसाचे प्रमाण अधिक होते. काही भागात पहाटे तर काही भागात सायंकाळीही पर्जन्यवृष्टी झाली. लांजा, चिपळूण तालुक्यात गारांचाही जोरदार वर्षाव झाला. रत्नागिरी, राजापूर, मंडणगड, गुहागर तालुक्यात काही भागात हलका शिडकावा झाला. गेल्या आठवडÎातील हवामानाचे चढउतार व त्या मागोमाग आलेल्या अवकाळीने आधीच्या संकटांतून सावरण्याआधीच शेतकऱयांसमोर नवे संकट निर्माण केले आहे.
लांजात गारपीट
दोन दिवस दाट धुके, त्या मागोमाग गुरुवारी पहाटे पावसाच्या हलक्या सारी तर दुपारी 3 च्या दरम्यान लांजा तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार गारा व गडगडाटासह अवकाळी पाऊस पडला. यामुळे आंबा, काजू बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. शिपोशी, कोचरी, सालपे, पालु, केळवली, माचाळ, हुंबरवणे, चिंचुर्टी या भागात गडगडाटासह गारांचा जोरदार पाऊस पडला. अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने नागरिक व वाहन चालकांची तारांबळ उडाली. लांजा पूर्वभागात दुपारी 3 च्या सुमारास सुमारे अर्धा तास पाऊस कोसळला. यात नागरिकांचे उन्हाळी सरपण, वैरण भिजून नुकसान झाले आहे.
राजापूर तालुक्यातील पाचल भागात पावसाचा शिडकावा झाला मात्र राजापूर शहर, परिसर आणि तालुक्याच्या किनारपट्टी भागात पावसाचा एकही थेंब पडला नाही. दिवसभर प्रंचड उष्मा जाणवत होता.
संगमेश्वर तालुक्यात वीज खंडित
संगमेश्वर तालुक्यामध्ये अनेक भागात गुरवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसाला. यावेळी तालुक्यात विजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसाने अनेकांची धावपळ झाली. अनेक मार्गावर चिखलयुक्त पाणी साठले होते. तालुक्यातील साखरपा, माखजन, देवरुख, संगमेश्वर, आरवली परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. गुरुवारी दिवसभर तालुक्यात ढगाळ वातावरण होते. साखरपा परिसरातही मध्यरात्री 3 च्या सुमारास एक-दीड तास जोरदार पाऊस कोसळला. यानंतर वीजपुरवठा खंडित झाला.
चिपळूण ग्रामीण भागाला पावसाने झोडपले
बुधवारी रात्री मेघगर्जनेसह कोसळलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनतेची त्रेधातिरपीट उडाली. वाळत टाकलेली कडधान्ये, बांधकाम साहित्य सुरक्षितस्थळी नेण्यासाठी अर्धी रात्र ग्रामस्थांना जागावी लागली. रात्री 11.30 वाजेपर्यंत पावसाची कोणतीही चिन्हे नव्हती. मात्र त्यानंतर अचानकपणे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाल्याने झोपी गेलेली गावे खडबडून जागी झाली. घरासमोर मांडव, छपरावर वाळत टाकलेले कडधान्य, हळद वाचवण्यासाठी सर्वाची धांदल उडाली. चिपळूण शहर वगळता बहुतांशी ग्रामीण भागात पावसाने रात्री तब्बल तासभर धुमशान घातले. सायंकाळी 5 वाजता पुन्हा मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. दरम्यान सायंकाळी झालेल्या पावसात काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला.
गुहागरात पावसाची हजेरी
गुहागर तालुक्यात गुरूवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या दमदार पावसाने आंबा व काजू व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गुरूवारी पहाटे 6 वाजता विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरूवात केली. तब्बल 1 तास रिमझिम पाऊस पडला. ढगाळ वातावरणामुळे झाडांना कीड प्रादुर्भाव मोठÎा प्रमाणात होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी रोहन छोटे यांनी सांगितले. यामुळे शेतकऱयांना पुन्हा फवारणी करून आलेल्या संकटाला समोर जावे लागणार आहे.
खेडमध्ये मध्यरात्री दाणादाण
खेड तालुक्यात विविध ठिकाणी बुधवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. गुरूवारी पहाटेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने वाहनचालकांना कसरतच करावी लागली. यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. काही भागात सायंकाळी 5 च्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने चिंता वाढली आहे.
खेडला भूकंपाचा सौम्य धक्का खेड : गुरूवारी पहाटे 5.30 च्या सुमारास खेड परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. अचानक बसलेल्या हादऱयाने साखरझोपेतील नागरिकांची धावपळ उडाली. दिवस-भर सर्वत्र भूकंपाचीच चर्चा होती. यात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त