लांजा-वाडगाव रस्त्यावरील खेरवसे येथील घटना
प्रतिनिधी / लांजा
भरधाव टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोरीच्या कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात टेम्पोचालक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री 9.15 च्या सुमारास तालुक्यातील लांजावाडगाव रस्त्यावरील खेरवसे तिठा येथील मोरीजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोचालक मिलिंद शिंदे यांना गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यूमुखी पडले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर हे करीत आहेत.