प्रतिनिधी / दापोली
काही दिवसांपासून उष्णतेने कहर केला असला तरी मात्र सध्या दापोलीच्या तापमानात चढ उतार सुरू असल्याचे समोर आले आहे.
दापोलीचे कमाल तापमान दोन दिवस स्थिर असून किमान तापमानात मात्र घसरण होत असल्याचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून प्राप्त माहितीनुसार समोर येत आहे. 28 मार्च रोजी दापोलीत कमाल तापमान 40.7 तर किमान तापमान 17.3 तर 29 मार्च रोजी कमाल तापमान 34.2 तर किमान तापमान 19.9 तसेच 30 मार्च रोजी कमाल तापमान 32.8 तर किमान तापमान 19.9 तर 31 मार्च रोजी कमाल तापमान 32 तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतका असल्याचे समोर आले आहे.
29 मार्च रोजी दापोलीत सर्वत्र धुकं पसरले होते. त्यामुळे पुन्हा गारठा निर्माण होईल असे वाटत असले तरी दापोलीच्या कमाल, किमान तापमानात चढ उतार सुरू असल्यामुळे उन्हाचे चटके दापोलीकरांना सोसावे लागत आहेत. मार्च महिन्यातच तीव्र उष्णतेला सामोरे जावे लागत आहे. तर एप्रिल मे या उन्हाळ्याच्या महत्वाच्या महिन्यात काय स्थिती निर्माण होईल याची चिंता साऱयांना पडली आहे.