प्रतिनिधी / मौजेदापोली
लॉकडाऊन जाहीर झाल्यानतंर दापोली तालुक्यातील सर्व एस. टी. बस फेर्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, आता अनलॉक प्रकिया सुरू झाली आहे. तसे असले तरी देखील दापोली तालुक्यातील अनेक बस फेर्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यामध्ये सकाळची उन्हवरे, केळशी, कर्दे, वेळवी आदी एस. टी. फेर्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात असे निवेदन दापोली आगाराला दिले आहे.
दापोली आगारात खेड, मंडणगड, चिपळूण, दाभोळ, उन्हवरे अशा बस सेवा सध्या सुरू आहेत. मात्र इतर गावांमध्ये अद्याप बस सेवा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नोकरदार मंडळींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बस सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून देखील जोर धरत आहेत.