बस सेवा सुरू करण्यात याव्यात याकरीता पत्रकारांनी दिले होते निवेदन
वार्ताहर/ मौजेदापोली
राज्य परिवहन महामंडळाच्या दापोली आगारातून ग्रामीण भागातील 8 गावांमध्ये बस सेवा सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या कालावधीत ग्रामीण भागातील बस सेवा बंद करण्यात आली होती. या फेऱया सुरू करण्यात याव्यात याकरीता दापोलीतील पत्रकारांनी आगार पमुख यांना निवेदन सादर केले होते. यानुसार आता लॉकडाऊन संपल्यामुळे काही गावांमध्ये दोन फेऱयांची बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये भडवळे येथे दापोली येथून सकाळी 11 वाजता तर सायंकाळी 4 वाजता, उन्हवरे येथे सकाळी 8 वाजता तर सायंकाळी 3.30 वाजता केळशी सकाळी 8 वाजता तर सायंकाळी 3.30 वाजता पाजपंढरी-हर्णैपर्यंत सकाळी 10 वाजता व दुपारी 2 वाजता, कर्दे सकाळी 8 वाजता तर दुपारी 2 वाजता, ताडील सकाळी 8 वाजता, उंबरघर येथे सकाळी 7 वाजता, बेजेवाडी सकाळी 10 वाजता तर दुपारी 3 वाजता अशी सेवा सुरू करण्यात आली असून प्रवाशांच्या संख्येनुसार यात बदल करण्यात येणार असल्याचे दापोली आगाराकडून सांगण्यात आले. यामुळे दापोलीतील पत्रकारांचे पवासी वर्गातून अभिनंदन होत आहे.