वार्ताहर / मौजेदापोली
कोरोनाच्या रूग्णांमध्ये कमालीची वाढ होत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून मिनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. यामुळे विविध नियमावली जाहीर करण्यात आली असून काही व्यावसायांकरिता ५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनला दापोलीतील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असल्याचे कापड व्यावसायिक राकेश माळी व दिनेश जैन यांनी सांगितले.
दापोलीतील व्यापाऱ्यांनी या मिनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला होता. त्यानंतर प्रांताधिकारी यांची भेट घेवून चर्चा केली. मात्र आठ दिवस पूर्णत: दुकाने बंद ठेवा. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी देखील आवाहन केले आहे. आठ दिवसानंतर व्यापाऱ्यांना कशा प्रकारे मुभा द्यायची याचा विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारनंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आल्याचे दापोलीतील व्यापारी दिनेश जैन यांनी सांगितले.