वार्ताहर / मौजेदापोली
शासनाकडून 9 वी ते 12 वी पर्यंत शाळांचा मुहूर्त काढण्यात आला असला तरी दापोलीतील अनेक शाळांना पालकांच्या ‘येस अॅण्ड नो’ प्रतिक्षा लागलेली आहे. तर काही शाळांच्या शिक्षकांची कोविड तपासणी सुरू असून काहींचे अहवाल येणे आहेत. त्यामुळे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे.
दापोलीत कोरोनानंतर सुरू होत असलेल्या शाळांमध्ये पहिल्या दिवशी परवानगी घेवून 507 विद्यार्थ्यांनी पहिली हजेरी लावली असल्याचे शिक्षण विभागाकडून चौकशी दरम्यान सांगण्यात आले. अजून काही शाळांमध्ये अद्याप पालक सभा घेण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर काही शाळा महाविद्यालये काही कारणात्व आज पासून अर्थात मंगळवारपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. तर काही शाळांचे शिक्षकांची कोविड तपासणी सुरू असून काहींचे अहवाल अद्याप न आल्याने शाळा बंद ठेवून उद्या किंवा परवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देखील समोर आले आहे.
विद्यार्थ्यांची ऑक्सीमिटर, थर्मामीटरद्वारे तपासणी करून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. शाळांनी स्वच्छतेच्या विषयात कामगिरी केलेली असली तरी, पालकांच्या परवानगीची प्रतिक्षा अजूनही शाळांना लागली असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले.