प्रतिनिधी / दापोली
पूर्ण क्षमतेने भरलेला कंटेनर चढातून उलट दिशेने आल्याने कंटेनरच्या मागे असणारा दुचाकीस्वार विद्यापीठ कर्मचारी चिरडून ठार झाल्याची घटना दापोली तालुक्यातील नवशी फाटा जवळ सोमवारी सकाळी घडली.
दापोली तालुक्यातील टेटवली येथील कदम वाडीती सुरेश कात्रे (वय 45) हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील हॉर्टीकल्चर विभागात कामाला होते. ते सकाळी आपल्या कर्तव्यावर निघाले असता कुंभवेनदी या पुलावरून जात असता हा अपघात घडला. त्यांच्या पुढे पूर्ण क्षमतेने भरलेला एक कंटेनर खेडकडून दापोलीकडे जात होता. हा कंटेनर चढामध्ये बंद कडून उलट्या दिशेने मागे आला. या कंटेनरच्या मागून सुरेश कात्रे हे आपली मोटरसायकल घेऊन दापोलीकडे येत होते. त्यांना त्यांना मागे येणाऱ्या कंटेनर ने चिरडले. या अपघातात सुरेश कात्रे हे जागीच ठार झाले.
सुरेश कात्रे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.