प्रतिनिधी / दापोली
देशभरात फैलावत असणाऱ्या बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर दापोली शहरात गुरुवारी सकाळी पाच कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
दापोली नगरपंचायत कचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी सकाळी हे पाच कावळे दापोली शहरातील काळकाई कोंड येथील डम्पिंग ग्राउंड परिसरात मृतावस्थेत आढळून आले दापोली नगरपंचायतीच्या माध्यमातून ही गोष्ट दापोली शहरातील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ लोंढे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली त्यांनी हे कावळे पुण्याला पाठवले असल्याची माहिती पत्रकारांची बोलताना दिली तसेच दापोलीमध्ये अन्य ठिकाणी असे पक्षी मृतावस्थेत आढळून आले तर त्यांना हात लावू नये पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी बोलताना केले.
शिवाय महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची बर्ड फ्ल्यू’ची सात आलेली नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे देखील आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले आहे मात्र हे पाच कावळे अचानक कशामुळे मेले याबद्दल संभ्रम कायम आहे.