प्रतिनिधी / दापोली
दापोली पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे सभापती रउफ हजवानी यांनी नुकतीच मुंबई येथे जाऊन सेना नेते रामदास कदम यांची भेट घेतली. शिवाय त्यांच्या पत्नी यांनी शिवसेनेचे अधिकृत प्रवेश केला. यानंतर हजवानी यांनी आपला सभापती पदाचा राजीनामा मागे घेतला असून सभापतिपदी तेच राहणार हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यास ते ज्या पक्षाच्या चिन्हावर म्हणजे राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडून आले आहेत त्यांचे ते पंचायत समिती सदस्य पद रद्द होऊ शकले असते. याने त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागले असते. मात्र आता पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एक वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे ही रिस्क घ्यायला कोणीही तयार नाही. यामुळे त्यांना तूर्तास राष्ट्रवादीतच राहण्याचा सल्ला शिवसेनेने दिलेला असल्याची चर्चा आहे.