प्रतिनिधी / खेड:
गोवालगतच्या मथुरा जंक्शनच्या कोसिकला रेल्वे स्थानकानजीक तांत्रिक बदल करण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. यामुळे शनिवारपासून २८ डिसेंबरपर्यंत कोकण मार्गावरून धावणारी निजामुद्दीन – मडगाव राजधानी सुपरफास्ट एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. राजधानी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे. मात्र, डिसेंबर अखेरीस राजधानी एक्सप्रेस पुन्हा धावणार असल्याने पर्यटकांची गैरसोय दूर होणार आहे.