प्रतिनिधी / खेड
भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश धनगर समाज प्रमुखपदी अँड. मिलींद जाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाच्या प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी तसे नियुक्ती पत्र दिले आहे.
अँड. जाडकर गेली ३४ वर्षांपासून भाजपमध्ये निष्ठेने काम करत असून सलग दोन वेळा भटक्या विमुक्त आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदाची धुराही सांभाळली आहे. याकालावधीत केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेवून त्यांच्याकडे प्रदेश धनगर समाज प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर रत्नागिरीच्या भाजपा विधी व प्रज्ञा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी ते कार्यरत असून अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचेही ते जिल्हा सरचिटणीस आहेत.
महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती व आरक्षण कृती समितीचे सल्लागार, जिल्हा विवेक मंचचे जिल्हा संयोजक व धर्म जागरण समन्वयचे प्रांत प्रमुखपदी कार्यरत आहेत. आजवर निष्ठेने केलेल्या कार्याची भाजपने पोचपावतीच दिली असून धनगर समाजाला संघटीत करण्यासह न्याय हक्क मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे अँड. जाडकर यांनी सांगितले.