प्रतिनिधी / मंडणगड
मंडणगड नगरपंचायतीच्या 2020-21मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता प्रभाग आरक्षणच सोडतीचा प्रशासकीय कार्यक्रम प्रांताधिकारी शरद पवार यांच्या उपस्थितीत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात मंगळवारी पार पडला. तहसीलदार नारायण वेगुर्लेकर व मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत 2015च्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी निर्धारीत झालेले प्रभाग क्रमांक बदलण्याबरोबरच जुने आरक्षणही रोटेशन पध्दतीने चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले.
प्रभागनिहाय बदललेले आरक्षण खालीलप्रमाणे
प्रभाग क्र. 1 : आदर्श नगर- सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 2 : बोरीचा माळ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्र. 3 : केशवशेठ लेंड नगर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
प्रभाग क्र. 4 : शिवाजीनगर- सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. 5 : साईनगर- सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. 6 : दुर्गवाडी 2- नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला
प्रभाग क्र. 7 : सापडेवाडी- सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. 8 : दुर्गवाडी 1- सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 9 : भेकतवाडी- सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 10 : कोंझर- नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला
प्रभाग क्र. 11 : धनगरवाडी- सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. 12 : तुरेवाडी/ पुंभारवाडी-सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 13 : बौध्दवाडी 1- सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. 14 : बौध्दवाडी 2- अनुसूचीत जाती महिला राखीव
प्रभाग क्र. 15 : गांधी चौक 2- सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. 16 : गांधी चौक 1- सर्वसाधारण खुला
प्रभाग क्र. 17 : तुरेवाडी / सोनारवाडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव.
मंगळवारी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता प्रभाग क्र. 1, 8, 9, 12, 13 हे पाच प्रभाग आरक्षित झाले आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव प्रवर्गाकरिता प्रभाग क्र. 2, 3, 17 हे तीन प्रभाग आरक्षित झाले आहेत. अनुसूचीत जाती महिलांकरिता प्रभाग क्र. 14 आरक्षित झाला आहे. महिलांकरिता एकूण 9 प्रभाग आरक्षित झाले आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला या आरक्षणाकरिता प्रभाग क्रमांक 6, 10 आरक्षित झाले आहेत, तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक 4, 5, 7, 11, 15, 16 खुले झाले आहेत. प्रभाग आरक्षण सोडतीवर आक्षेप नोंदवण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.