प्रतिनिधी / राजापूर
मुंबई गोवा महामार्गावर वरचीपेठ मोठया पुलानजीक कोंढेतड वळणावर गोव्याकडून मुंबईकडे जाणार ट्रक रस्त्यापासून सुमारे १०० ते १२० फुट खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघात सुदैवाने चालक बालंबाल बचावला आहे. रामप्रसाद मिना.३५ रा. राजस्थान असे या चालकाचे नाव असून प्रसंगावधान राखत या चालकाने गाडी बाहेर उडी मारल्याने तो बचावला आहे.
त्याच्या डोक्याला दु:खापत झाली असून त्याच्यावर राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या अपघातात ट्रकचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.