प्रतिनिधी / संगमेश्वर
आज दि.८ मे रोजी सकाळी आरवली राजीवली मार्गावर मुरडव येथे डंपर आणि मोटारसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात योगेश तुकाराम बाटे (वय २८) जागीच ठार झाला.या अपघातात मोटारसायकलस्वाराचा चेंदामेंदा झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास मुरडव बाटेवाडीत राहणारे योगेश तुकाराम बाटे हा आरवलीहून मुरडवकडे आपली मोटारसायकल क्रमांक एमएच ०४ डीएच १९८३ ने चालला होता. मुरडव येथील छोट्याशा वळणावर येताच समोरून येणाऱ्या डंपर क्रमांक एमएच ०४ सीयू ९६६३ आणि मोटारसायकल यांच्यात धडक झाली. मोटारसायकल चालक याची धडक डंपरच्या उजव्या बाजूच्या मागील चाकाला आदळला.डंपरचे चाक योगेश बाटेच्या डोक्यावरून गेले. ही धडक एवढी मोठी होती की, मोटारसायकलस्वार योगेश बाटे जागीच ठार झाला.