अवैध गुरे वाहतुकीविरोधातील सलग दुसरी कारवाई
वार्ताहर/राजापूर
राजापूर तालुक्यातील पूर्व परिसरातून परजिल्ह्यात विनापरवाना गुरे वाहतूक करणाऱयांना स्थानिक ग्रामस्थांनी पाठलाग करत पकडले असून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी अणुस्कूरा मार्गावर ही कारवाई करण्यात आली.
गुरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी बुलेरो चालक समीर बाळासो मुजावर (रा.कोल्हापूर), तरबेज ठाकूर, दिनेश पावसकर (रा.परटवली) यांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. यातील गुरांना रायपाटण येथील गोशाळेत देखरेखीसाठी ठेवण्यात आले आहे.
अणुस्कूरा घाटात पांगरी पुनर्वसन येथे गाडी थांबवून आत पाहणी केली असता गाडीत जनावरे असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तात्काळ राजापूर पोलिसांना संपर्प साधला. राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संतोष वालावलकर, हेड कॉन्स्टेबल पी.ए.वाघाटे, सागर कोरे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी गाडीमध्ये 2 बैल व 4 गायी अशी सात जनावरे आढळून आली. यातील एक गाय मृत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक ग्रामस्थांनी पाठलाग करत अवैध गुरे वाहतुकीचा पर्दाफाश केला. यामुळे ग्रामस्थ व पोलिसांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.