पावसाची संततधारा सुरूच
प्रतिनिधी / संगमेश्वर
सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले असून माखजन बाजारपेठ, कसबा बाजरपेठेतील दुकानांतून पुराचे पाणी घुसले आहे. धोका वाढल्याने नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कसबा ,फुणगूस,माखजन बाजारपेठेतील काही मार्ग बंद झाले आहेत.