प्रतिनिधी / खेड
महाराष्ट्र योगा असोसिएशनच्या अधिपत्याखाली व जिल्हा योगा असोसिएशन यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन योगा स्पर्धेत भरणे बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तिघींनी पदके पटकावली. या तिघींची राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे.
स्पर्धेत १० ते १२ वर्षीय गटात अनुष्का म्हातले हिने सुवर्णपदक, प्रांजल आंबेडे हिने रोप्य तर १८ ते २१ वयोगटात अक्षता कदम हिने सुवर्णपदक प्राप्त केले. या खेळाडूंना योगा प्रशिक्षक गौरव आंब्रे, श्रेयस पाटणे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था चेअरमन बिपीन पाटणे यांच्याहस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. अजित भोसले, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, समन्वयक राहुल गाडबैल यांच्यासह संस्था पदाधिकारी उपस्थित होते.