प्रतिनिधी / लांजा
कोरोनाच्या महामारीमुळे गेली सात ते आठ महिने बंद असलेला लांजाचा आठवडा बाजार मंगळवारपासून सुरू झाला. बाजारात स्थानिकसह परजिलह्यातील व्यापाऱ्यांनी गजबजला मात्र किरोनाच्या सवटामुळे ग्राहकांनी पाठ केल्याचे दिसून आले.
लांजाचा मंगळवारचा आठवडा बाजार सुरु करण्यात यावा यासाठी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकांनी लांजा तहसीलदार यांच्याकडे मागणी केली होती. अखेर प्रशासनाने बाजार सुरू करण्यास परवानगी दिले. त्यानुसार सात महिन्यांनी मंगळवारी पहिला आठवडा बाजाराच सुरू झाला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या आठवडा बाजारात स्थानिक व परजिह्यातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने मांडली होती. भाजी मार्केट, मच्छी मार्केट, किराणा दुकाने, यांसह छोटी-मोठ्या दुकानांने ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू झाली होती. आठवडा बाजार सुरू करण्यात येणार असल्याचे लांजा व्यापारी संघटनेने सोमवारी सोशल मीडियावर जाहीर केले होते. त्यामुळे लांजा शहराच्या आजूबाजूच्या गावातील बहुतांश नागरिक आठवडा बाजारात दाखल झाले होते. एकीकडे कोरोनाची भीती यासह भातशेतीच्या कामामध्ये नागरिक गुंतले असल्याने सुरू झालेल्या पहिल्या आठवडा बाजाराला जास्त प्रमाणात गर्दी नव्हती.
दरम्यान, आठवडा बाजार सुरू व्हावा अशी सर्व नागरिकांची मागणी होती. कोरोना संकटामुळे लॉक डाऊन सुरु करण्यात आले होते तेव्हा पासून नागरिकांची काळजी व बाजारात गर्दी होऊ नये यासाठी लांजा तालुक्याचा मंगळवारी भरणारा आठवडा बाजार व्यापारी संघटना व शासनाच्यावतीने बंद ठेवण्यात आला होता. मात्र कोरोनाचे संकट प्रमाण कमी झाल्यामुळे लांजाचा आठवडा बाजार पुन्हा सुरू करण्यात आला आहे. दिवाळी सणानिमित्त फक्त सुरू आठवड्यातील बुधवार दिनांक 11 नोव्हेंबर 2020 रोजी संपूर्ण दिवस बाजारपेठ पूर्णत चालू राहणार आहे. असे आवाहन लांजा तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी केले आहे. मात्र त्यापुढील मंगळवारचा आठवडा बाजार नियमित सुरू राहणार आहे. कोह्यपूर, सांगली या परजिह्यातून व्यापारी येत असल्याने नागरिक कोरोनाबाबत काळजी घेत आहेत.