भाजपच्या किरीट सोमय्यांनी घेतली एसटी कर्मचाऱयांची भेट
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील माळनाका येथील एसटीच्या विभागीय कार्यालयाबाहेर आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱयांची भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी भेट घेतल़ी यावेळी सोमय्या यांनी एसटी कर्मचाऱयांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिल़े दरम्यान रत्नागिरी विभागातून आणखी 4 जणांना सेवेतून निलंबित करण्यात आले आह़े
एसटीचे शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील 16 दिवसांपासून संपावर आहेत़ संप मोडून काढण्यासाठी एसटी महामंडळाकडून कारवाई करण्यात येत आह़े रत्नागिरी विभागातील 31 जणांवर सेवा समाप्तीची कारवाई तर 91 जणांचे निलंबन करण्यात आले आह़े मंगळवारी आणखी 19 जण कामावर हजर राहिले आहेत़ यामुळे हजर कर्मचाऱयांची संख्या 150 झाली आह़े
संपाबाबत न्यायालयाने पुढील तारीख उशिराची दिल्याने आता कामावर हजर रहाण्याबाबत एसटी कर्मचाऱयांमध्ये संभ्रमावस्ता आह़े 16 दिवसांच्या संपानंतर काही कर्मचारी कामावर हजर राहण्याच्या मानसिकतेत तर काही विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आता डिसेंबर महिन्यातील सुनावणीपर्यंत संपावर तोडगा निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आह़े
संपात सहभागी झालेल्या रत्नागिरी विभागातील 249 कर्मचाऱयांना सेवा समाप्तीची नोटीस बजावत 24 तासात कामावर हजर होण्याचा इशारा देण्यात आला होत़ा आतापर्यंत यातील 31 कर्मचाऱयांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आह़े पुढील 2 दिवसांत अन्यजणांवरही कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आल़े