प्रतिनिधी / लांजा
लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे शॉर्ट सर्किटने दुकानाला आग लागून संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांना आग दिसून आल्याने त्यांनी डोळस यांना कळविले. मात्र दुकानाने पुर्णतः पेट घेतला होता. यामध्ये दुकानातील सर्व साहित्य जळाले. या आगीमध्ये प्रणय डोळस या दुकान व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.