रत्नागिरी / प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, रात्री उशीरा आलेल्या अहवालात रत्नागिरी शहरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.
आता कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडेच वाढल्याने आरोग्य सेवा बजावणाऱ्या कोरोना योद्धांना ही याची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे आता संपूर्ण हॉस्पिटल कोरोंटाईन मध्ये आहे. अँटिजेंन चाचणीत 4 जण पॉझिटिव्ह आल्याने सर्वांचे स्वब टेस्ट देण्यात आले होते यामध्ये एकूण 10 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.