कोरोना लसीकरण नियोजन अंतिम टप्प्यात : पहिल्या टप्प्यात 13 हजार आरोग्य कर्मचारी : लसीकरण केंद्राचे तीन विभागात वर्गीकरण
जान्हवी पाटील / रत्नागिरी
रत्नागिरीत डिसेंबरअखेर अथवा जानेवारीत कोरोना लस उपलब्ध होणार आहे. लसीकरण अभियानासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आरोग्य विभागाची बैठक नुकतीच घेतली. त्यानंतर आरोग्य विभागाकडून नियोजन व अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरातील 3 प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरण केंद्र म्हणून निवडण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात 13 हजार आरोग्य सेवेतील घटकांना लस देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संघमित्रा फुले यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.
कोरोना प्रतिबंधात्मक लस अत्यावश्यक सेवेतील घटकांपर्यंत सुरळीतपणे पोहोचविण्यासाठी सरकारने सावध पाऊल उचलले आहे. आरोग्य विभागाने या संदर्भातील डिसेंबरअखेर तयारी पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सध्या वैद्यकीय अधिकाऱयांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कोरोना लसीकरणासाठी आरोग्य विभागाची तयारी अंतिम टप्प्यात असून यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या आहेत. हे लसीकरण 3 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी, दुसऱया व तिसऱया टप्प्यात प्राधान्याने सेवा बजावणाऱयांचा समावेश असून अद्यापही या बाबत अतिम माहिती समोर आलेली नाही. पहिल्या टप्प्यासाठी शासकीय व खासगी रूग्णालयातील आरोग्य कर्मचारी, अधिकाऱयांची माहिती गोळा केली जात आहे.
रत्नागिरी शहरातील कोकणनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, झाडगांव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा शासकीय रूग्णालय हे लसीकरण केंद म्हणून सुरू करण्यात येणार आहे. जिल्हय़ात अन्य ठिकाणीही लसीकरण केंद्रांचे नियोजन सुरू आहे. या लसीकरणासाठी आवश्यक कर्मचारी व अधिकाऱयांचे नियोजनही आठवडाभरात पूर्ण होईल, असे डॉ. फुले यांनी सांगितले.
सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत लसीकरण
लसीकरण अभियान सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. यासाठी आवश्यकता वाटल्यास हॉल, कॉलेज, शाळांचाही वापर करण्यात येणार आहे.
फ्लो चार्ट किंवा तीन कक्षांच्या डिझाईनमध्ये मांडणी करावी …
अशी असेल लसीकरण केंद्राची व्यवस्था
प्रतीक्षालय कक्ष- ओळखपत्रांची पडताळणी करून लस घेण्याची वेळ दिली जाईल. शारीरिक अंतर ठेवून बसण्याची व वारंवार सॅनिटायझेशनची व्यवस्था.
लसीकरण कक्ष- कक्षात एकावेळी एकाच व्यक्तीला प्रवेश व प्रत्यक्ष लसीकरण. महिलेला लस देण्यासाठी महिला कर्मचाऱयाची नियुक्ती.
देखभाल कक्ष- लसीकरणानंतर 30 मिनिट या कक्षात लसीच्या परिणाम व प्रभावाचे निरीक्षण. शारीरिक अंतर व निर्जंतुकीकरणाच्या सूचनांचे पालन.