प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील पुरातन श्री कर्णेश्वर मंदिर येथे संपन्न होणारा ११ मार्चचा वार्षिक महाशिवरात्रोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती मंदिर विश्वस्त समितीचे निबंध कानिटकर यांनी दिली .
महाशिवरात्रीच्या दिवशी शासकीय नियम पाळून धार्मिक विधी संपन्न होणार आहेत . मात्र यात्रेसाठी व्यावसायिकांनी आपली दुकाने घेऊन येवू नये , असे कर्णेश्वर देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे . ११ मार्च रोजीची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली असल्याची भाविकांनी नोंद घ्यावी असे देवस्थान समितीचे अध्यक्ष निळकंठ जोशी यांनी कळविले आहे .