(अंतिम भाग)
नमस्कार, कोणत्याही ज्योतिषाला न विचारता तुम्ही खालील काही क्रिस्टल्स वापरू शकता. 1. अमेथिस्ट-संरक्षण, भीती दूर करतो. 2. सिट्रीन-प्रेमसंबंधात वृद्धी करतो. 3. रोझ क्वार्टझ-मानसिक समस्यांकरता, 4. टर्मलाईन-पोटाचे रोग, आत्मविश्वासाकरता, 5. क्लीयर क्वार्ट्झ-कलाकारांना आणि वैद्यांना वरदान, 6. सेलेनाईट-ज्योतिषांना वरदान, 7. ऑब्सेडीयन- वाईट शक्तींना दूर ठेवतो. 8. कार्नेलीयन-मासिक पाळीसंबंधी तक्रारींकरता आणि एकाग्रता वाढण्याकरता 9. लॅपीझ लझूली-ज्ञानाकरता, 10. फ्लोराईट- द्विधा मनःस्थिती जाण्यासाठी. 11. ब्लॅक टर्मलाईन-नैराश्य आणि भीती जाण्यासाठी.
खालील टेबलमध्ये रत्नांविषयी पूर्ण माहिती देत आहे. उपरत्ने खूप स्वस्त असतात. ती कमीत कमी 6 कॅरेटची वापरावी.
रत्न, ग्रह, उपरत्न कोणत्या बोटात घालावे कोणत्या रत्नांबरोबर घालू नये
1. माणिक रवी रेडगार्नेट, रेड टर्मलाइन अनामिका- मोती/चंद्रकांत मणी, नीलम, गोमेद, लसण्या
2. मोती/मून स्टोन चंद्र, – करंगळी माणिक, नीलम, गोमेद, लसण्या
3. पोवळे- मंगळ कार्नेलीयन करंगळी,अनामिका नीलम, गोमेद, हिरा, लसण्या
4. पाचू बुध/पेरीडॉट, ग्रीन टर्मलाईन करंगळी गोमेद, लसण्या
5. पुष्कराज- गुरु/ यलो टोपाझ/तर्जनी नीलम, गोमेद, लसण्या
6. हिरा शुक्र/ओपल,पांढरा झिरकॉन मध्यमा पोवळे, माणिक, गोमेद, लसण्या
7. नीलम शनि/अमेथिस्ट,लॅपीझ मध्यमा-मोती, माणिक, पोवळे
8. गोमेद- राहू ऑरेंज सिरकॉन मध्यमा-माणिक, मोती, पोवळे, पुष्कराज
9. लसण्या- केतू /मध्यमा- माणिक, मोती, पोवळे, पुष्कराज
महाउपाय- घरात कोणी खूप आजारी असल्यास डॉक्टरी उपचारासोबत हेही करा. वडाच्या झाडाच्या उत्तरेकडची मुळी (1 इंच) हळद लावून रोग्याच्या उजव्या गुडघ्याजवळ पिवळय़ा धाग्यात बांधावी.
सोपी वास्तू टीप – घरात कधीही गणपती, बालाजी वगैरे देवतांचे फक्त डोके (धड नाही असे) ठेवू नये. राहू प्रबळ होतो.
मेष
तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांवर रागराग करू नका. ताणतणाव वाढणार आहे. व्यवसायात देवाण घेवाण जपून करा. नोकरदारांना अधिक श्रम करावे लागतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासावरून उडू शकते. वैवाहिक जीवनात घरगुती कारणामुळे वादावादीचे प्रसंग येतील.
उपायः मंगळवारी मसूर आणि गूळ दान करा. धनप्राप्ती वाढेल.
वृषभ
आत्मविश्वासाच्या जोरावर कष्टाचे चीज कराल. धैर्य आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांची कास सोडू नका. शंका असल्यास ज्ये÷ांचा सल्ला घ्या. कामाच्या ठिकाणी कोणीतरी चुकीचा सल्ला देऊ शकतो. प्रवासाचे योग आहेत. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे तब्येतीवर परिणाम होईल. वैवाहिक जीवनात मधुरता येईल.
उपायः दूध, दही, साखर आणि पांढरे फूल दान करा.
मिथुन
बाहेरचे टेन्शन घरी आणल्यामुळे कौटुंबिक वातावरणात ताण येईल. बोलताना शब्द जपून वापरा. कोणाचीही चेष्टा करू नका. वाद महागात पडू शकतो. मंगल कार्यात सहभागी व्हाल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. जोडीदाराचे योग्य वेळी सहकार्य मिळेल. तब्येत सांभाळा.
उपायः ‘ॐ हं हनुमते नमः’ मंत्राचा शक्मय तितका जप करा.
कर्क
सुख आणि सौभाग्यदायी काळ आहे. बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळतील. व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. घरातील वातावरण ठीक राहील. मध्यस्थीमुळे जमिनीचे वाद मिटतील. तब्येत ठिकठाक राहील. धनप्राप्ती उत्तम. वैवाहिक जोडीदारांची पूर्ण साथ मिळेल.
उपायः शिवलिंगावर दुधात मध घालून अभिषेक करा.
सिंह
प्रत्येक पाऊल जपून टाकण्याची आवश्यकता आहे. निर्णय चुकू शकतात. रागामुळे नुकसान होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्लॅन्स कोणालाही सांगू नका. आर्थिक आवक चांगली असेल पण चैनीच्या वस्तूंवर खर्च होईल. वैवाहिक जीवनात थोडी वादावादी होईल.
उपायः सुयोग्य व्यक्तीला तांब्याचे पात्र दान करा.
कन्या
संभ्रम वाढवणारे दिवस आहेत. बऱयाच बाबतीत काय करावे हे कळणार नाही. महत्त्वाचे निर्णय सध्या टाळलेले बरे. गुप्तशत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. नोकरी, व्यवसायामध्ये लवकरच अनुकूल वेळ येणार आहे. तोपर्यंत संयम ठेवा. वैवाहिक जोडीदाराचे स्वास्थ्य बिघडू शकते.
उपायः बुधवारी मुगाच्या डाळीचा शिरा लहान मुलांना वाटा.
तुळ
पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे फळ मिळेल. आर्थिकदृष्टय़ा उत्तम काळ आहे. कुटुंबात मंगलकार्य संपन्न होईल. व्यापारी वर्गाला दिलासादायक वेळ आहे. नोकरीमध्ये सहकर्मींचे आणि वरि÷ांचे सहकार्य मिळेल. शनिवार-रविवार मानसन्मानाचे, वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण असेल.
उपायः कामाला जाताना आईचा/महिलेचा आशीर्वाद घ्या.
वृश्चिक
सगळय़ा अडचणींशी एकदम भिडण्यापेक्षा एक एक अडचण स्वतंत्रपणे सोडवा. कामाचा ताण तब्येतीवर परिणाम करू शकतो. व्यापार, धंद्यात एखादी व्यक्ती शब्द पाळणार नाही आणि म्हणून तुम्ही नाराज व्हाल. वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. दुसऱयांच्या भानगडीत पडू नका.
उपायः नारळावर शेंदूराचे बोट लावून हनुमानाच्या मंदिरात ठेवा.
धनु
कोणत्याही परिस्थितीत घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. नुकसान होण्याची शक्मयता आहे. तब्येतीची तक्रार राहील. मित्रांशी वाद होऊ शकतात. आर्थिक नियोजन नीट करा. अन्यथा कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. छोटय़ा मोठय़ा प्रवासात तब्येत आणि सामान दोन्ही सांभाळा. वैवाहिक जोडीदाराचा सल्ला ऐका.
उपायः शनिवारी अभ्यंगस्नान करा. पक्ष्यांना नाचणा घाला.
मकर
छोटय़ा लाभाकरता नातेसंबंध बिघडू देऊ नका. कौटुंबिक समस्येवर सर्वानुमते निर्णय घ्या. घराच्या डागडुजीवर खर्च होईल. भाऊ, बहीण यांची काळजी वाटेल. एखाद्या महिला सहकाऱयामुळे ऑफिसची कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवन सामान्य राहील. तब्येत सांभाळा.
उपायः दिव्यांगांना यथाशक्ती मदत करा.
कुंभ
बरेच दिवस रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांच्या मदतीमुळे मोठय़ा संधी प्राप्त होतील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जमिनीसंबंधी व्यवहार सध्या टाळा. मंगलकार्यात सहभागी व्हाल. काम धंद्याच्या ठिकाणी वादविवाद टाळा. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील.
उपायः तिळेल दान करा. गरजवंताला चप्पल द्या.
मीन
मित्र किंवा सोबत काम करणारे चुकीचा सल्ला देऊन भ्रमीत करण्याचा प्रयत्न करतील. सावध रहा. तब्येत नरम राहील. कफ विकार संभवतात. आपल्या योजना कोणालाही सांगू नका. अपेक्षित लोकांकडून मदत न मिळाल्याने मन खिन्न राहील. छोटय़ा यात्रेचा योग आहे.
उपायः गुरुवारी पिंपळाची पूजा करा. मुंग्यांना साखर घाला.