वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ातील रबकवी-बनहट्टी परिसरात पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शनिवारी रात्री जोरार पाऊस पडल्याने रस्त्यातून पाण्याचे लोट वाहत होते तर काही सखल भागातील गल्ल्यातील घरांमून पाणी शिरल्याने रात्र जागून घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रसंग अनेक कुटुंबीयांना अनुभवावा लागला. घरात पाणी शिरल्याने अन्नधान्याचे नुकसान झाले. रात्री 9.30 ते 2 दरम्यान पावसाने परिसराला झोडपून काढले असून जिल्हय़ात अन्य भागात पण संततधार पाऊस पडला. ढगाळ हवामान असून अधूनमधून पाऊस पडतच आहे.