मखर-सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी : कापडी मखरांनाही नागरिकांची वाढती मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आता प्रत्येक गणेशभक्ताला लागली आहे. आपल्या लाडक्मया गणरायासाठी लागणारे मखर व इतर सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी खरेदी जोमात सुरू आहे. यावषी थर्माकोलपेक्षा फोम व रबर शिटच्या सुरेख व डिजिटल स्वरुपातील मखरांना पहिली पसंती दिली जात आहे.
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने खरेदीला उत्साह आला आहे. गणेशमूर्तींना साजेसे मखर गणेशभक्त खरेदी करतात. यापूर्वी आकर्षक थर्माकोलच्या मखरांचा बोलबाला होता. बेळगावसह गोवा व चंदगड परिसरातील नागरिक खरेदीसाठी बेळगावमध्ये दाखल होत असत. परंतु कोरोनामुळे मागील वषी या खरेदीला ब्रेक लागला.
शहरात किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, बापट गल्ली, भातकांडे गल्ली या भागात मखर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. थर्माकोलसह इतर मखरही बाजारात उपलब्ध आहेत. गणरायासाठी खरेदी करताना आवर्जून मखर खरेदी केली जाते. मागील काही वर्षांपासून कापडी मखरांनाही नागरिकांची मागणी आहे. कापडी मखर टिकाऊ असल्याने नागरिकांचा त्याकडे कल आहे.
आकर्षक मखर हजार रुपयांपुढे
थर्माकोलचे मखर हजार रुपयांपासून पुढे आकार व सजावटीनुसार उपलब्ध आहेत. रबर शीटच्या मखरांमध्ये आकर्षक लायटिंगची व्यवस्था असून हे मखर 800 रुपयांपासून विक्री केले जात आहेत. डिजिटल प्रिंट असलेल्या फोमच्या मखरांमध्ये लायटिंग असून रिमोटच्या साहाय्याने बदल करता येतो. हे मखर गणेशोत्सवानंतर हॉलमध्ये वॉल पेपर म्हणून लावता येऊ शकतात. 2 हजार रुपयांपासून पुढे हे मखर बेळगावच्या बाजारात उपलब्ध आहेत.
नवीन असल्याने सर्वाधिक मागणी
मागील वषीपेक्षा यावषी खरेदीचा उत्साह वाढला आहे. चार दिवसांपासून गणेश भक्तांमधून खरेदी मोठय़ा प्रमाणात सुरू झाली आहे. या वषी रबर शीट व फोम शीट अशा दोन प्रकारांमध्ये मखर उपलब्ध आहेत. हा पॅटर्न नवीन असल्यामुळे याला सर्वाधिक मागणी असल्याचे आनंद धामणेकर यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.