ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. हे संकट रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आहे. यातच मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिन्याला देखील सुरुवात झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रमजान च्या शुभेच्छा देत ट्विट केले आहे. कोरोना व्हायरसच्या संकटाला सामोरे जाणारे देशातील मुस्लिम बांधव शनिवारी पवित्र रमजान महिन्याचा पहिला रोजा आयोजित करतील.
पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, ‘रमजानच्या शुभेच्छा! मी सर्वांच्या सुरक्षा, कल्याण आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो. हा पवित्र महिना आपल्यास मुबलक दया, सौहार्द आणि करुणा आणो. चला सध्या सुरू कोरोना विरुद्धची लढाई आपण जिंकू आणि निरोगी ग्रह निर्माण करण्यात यशस्वी होऊया. असं मोदी यांनी म्हटले आहे.