सावंतवाडी / प्रतिनिधी:
सावंतवाडी व्यापारी उद्योजक आणि व्यावसायिक संघाचे अध्यक्ष श्री.जगदिश मांजरेकर यांचे भावोजी व मातोंड येथील रहिवासी रमाकांत तुळसकर यांचे अल्पशा आजाराने गोवा मेडिकल हाॅस्पिटल येथे सोमवार रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सुन असुन एक भाऊ भावजया, पुतणे भाचे मोठा परिवार आहे. गौरव तुळसकर यांचे ते वडील होत. रमाकांत तुळसकर सेवानिवृत्त सचिवालय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
रमाकांत तुळसकर दत्तभक्त होते.