4 लाखांचा निधी मंजूर : ग्रामस्थांमधून समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
अवचारहट्टी (येळ्ळूर) येथील विठ्ठलाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी जिल्हा पंचायतीच्या फंडातून या मंदिराच्या बांधकामासाठी 4 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सोमवारी त्यांनी मंदिराला भेट देऊन मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाची माहिती घेतली.
प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य कल्लाप्पा मेलगे यांच्या हस्ते जि. पं. सदस्य रमेश गोरल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना रमेश गोरल म्हणाले, अवचारहट्टीच्या सर्वांगीण विकासासाठी मी नेहमीच कार्यरत आहे. या ठिकाणी ग्रामदैवत विठ्ठलाई देवीचे मंदिर उभारले जात असून, त्याला जिल्हा पंचायतच्या फंडातून 4 लाखाचा निधी मंजूर करून दिला आहे. येळ्ळूर सोबतच या गावाचाही विकास
करण्याचा माझा प्रयत्न आहे. जितका उपलब्ध होईल तितका निधी खर्च करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
पाण्याचा प्रश्न सोडविणार
येळ्ळूरसोबतच अवचारहट्टी येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यामुळे गावात 24 तास पाणीपुरवठा करणे शक्मय होणार आहे. याचसोबत गावामध्ये कूपनलिका खोदाई करून पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, मारुती तुळजाई, विठ्ठल कुरंगी, सुनील पाटील, शिवाजी पाटील, तुकाराम पाटील, विठ्ठल यरमाळकर, ग्रामपंचायत माजी सदस्य यल्लाप्पा पाटील, विठ्ठल मेलगे, गोपाळ मेलगे, पुंडलिक तुळजाई, प्रकाश सांबरेकर, नारायण कुरंगी यासह येळ्ळूर व अवचारहट्टीतील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.