सातारा प्रतिनिधी
माझे अंगण हेच आंदोलनाचे रणांगण असे म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या सूचनेनुसार सातारा जिह्यातील कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी त्यांच्या घरासमोरच्या अंगणात आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त केला.
कोरोनाचा वाढतोय पारा म्हणूनच करा शेतकयाचा सातबारा कोरा,एफआरपीचा दर मिळाला पाहिजे आदी मागण्यांसाठी रयत संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्या सूचनेनुसार सातारा तालुक्यातील शिवथर येथे प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.