खामगाव तालुक्यातील बँकांमध्ये धडक, पिककर्जाच्या सोडविल्या अडचणी
प्रतिनिधी/कोल्हापूर
शेतकऱ्यांना पिककर्जाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व तातडीने पिककर्ज मिळवून देण्यासाठी ‘स्वाभिमानी’शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पिककर्जाबाबत ‘ऑन द स्पॉट फैसला’ ही मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील बँकांमध्ये स्वतः पोहचून ‘ऑन द स्पॉट’ तक्रारी व प्रकरणे मार्गी लावण्याचे काम रविकांत तुपकर करीत आहेत. बुलडाणा आणि चिखली तालुक्यानंतर आज २३ जुन रोजी खामगाव तालुक्यातील लाखनवडा स्टेट बँक,पळशी स्टेट बँक,अटाळी सेंट्रल बँक, खामगाव सेंट्रल बँक या बँकांमध्ये धडक देत त्यांनी पिककर्जाच्या अडचणी सोडवील्या.
पिककर्ज देऊन बँका शेतकऱ्यांवर उपकार करत नाहीत त्यामुळे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांप्रति सहकार्याची भावना ठेवावी असे आवाहन देखील रविकांत तुपकर यांनी केले तसेच शेतकऱ्यांना विनाकारण त्रास द्याल तर मी स्वतः बकेतच येवून ठाण मांडेल असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी बिनधास्तपणे ‘स्वाभिमानी’ हेल्पलाईन सेंटर कडे मांडाव्यात असे आवाहन देखील रविकांत तुपकर यांनी केले.
यावेळी रविकांत तुपकरांसमवेत राणा चंदन,शाम अवथळे,शेख युनिस,आकाश राऊत,रुपेश खेकडे,रवी भातुरकर,शेख समीर शेख,हबीब,अरुण इंगळे,गुलाब हटकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.