प्रतिनिधी/ बेळगाव
रविवारपेठ येथील एका दुकानात चोरीचा प्रकार घडला आहे. परिसरातील नागरिकांनी चोरटय़ाला रंगेहाथ पकडून मार्केट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र, बुधवारी रात्रीपर्यंत यासंबंधी पोलिसात फिर्याद दाखल झाली नव्हती.
रविवारपेठ येथील मारुती मार्केटिंग या सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानात चोरीची घटना घडली आहे. चोरी करणाऱया एका तरुणाला रंगेहाथ पकडून परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पहाटे मार्केट पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. बुधवारी रात्री मार्केट पोलिसांशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी पकडून दिलेल्या तरुणाची चौकशी केली जात आहे.