प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ात रविवारी 143 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. सक्रिय रुग्णसंख्या घटली असून गेल्या 24 तासात 232 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसंख्येत घट होत चालली असली तरी मृतांचा आकडा वाढतच आहे. रविवारी सरकारी आकडय़ानुसार कोरोनामुळे सहा जण दगावले आहेत.
चिकोडी तालुक्मयातील 3, बेळगाव, बैलहोंगल व गोकाक तालुक्मयातील प्रत्येकी 1 अशा एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून मृतांत दोन वृद्ध महिलांचाही समावेश आहे. रविवारी बेळगाव तालुक्मयातील 94 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. शहर व उपनगरांतील 70 व ग्रामीण भागातील 24 जणांचा त्यामध्ये समावेश आहे. बेळगावपाठोपाठ चिकोडी तालुक्मयातील रुग्णसंख्याही अधिक आहे. मुतगा, सांबरा, गौंडवाड, कंग्राळी बीके, बस्तवाड, कडोली, मेकलमर्डी, मच्छे, शिंदोळी, पिरनवाडी, विजयनगर-हिंडलगा, मराठा कॉलनी-हिंडलगा, ांढग्राळी खुर्द, सावगाव, कलखांब, कॅम्प, संभाजीनगर-वडगाव, मजगाव, शहापूर, अनगोळ, भाग्यनगर, चव्हाट गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, गुड्सशेड रोड, वैभवनगर, टिळकवाडी, बाळगमट्टी, शाहूनगर, अंजनेयनगर, हिंदवाडी, सदाशिवनगर, अयोध्यानगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
मारुती गल्ली, अशोकनगर, रविवार पेठ, वीरभद्रनगर, विद्यानगर, महांतेशनगर, ऑटोनगर, आझमनगर, बिम्स कॅम्पस, ज्योतीनगर, उज्ज्वलनगर, चांदू गल्ली, शास्त्राrनगर परिसरातही नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी लक्षणे नसणाऱयांवर त्यांच्या त्यांच्या घरीच उपचार करण्यात येत आहेत. लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांवर वेगवेगळी कोविड केअर सेंटर व इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 75 हजार 524 वर पोहोचली आहे. रविवारी 232 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 72 हजार 976 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 1 हजार 777 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्हय़ातील मृतांचा सरकारी आकडा 771 वर पोहोचला आहे.
आतापर्यंत 9 लाख 40 हजार 799 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 58 हजार 286 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप 2 हजार 741 हून अधिक जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. डेल्टा प्लसची धास्ती वाढल्यामुळे प्रशासनाने महाराष्ट्र, गोवा, केरळहून येणाऱयांना आरटीपीसीआर तपासणी अहवाल सक्तीचा केला आहे.