जिह्यात आतापर्यंत 362 जणांचा मृत्यू : रविवारी दोघांचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांची संख्या रविवारी कमी असली तरी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिह्यामध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा 362 वर पोहोचला आहे. रविवारी जिह्यामध्ये 372 नवे कोरोना रुग्ण आढळले असून सध्या 3 हजार 370 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
रविवारी कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाल कमी आला आहे. त्यामुळेच हा आकडा कमी असून उद्या मात्र आणखीन रुग्ण वाढण्याची भीती आरोग्य विभागातून व्यक्त करण्यात येत आहे. मतमोजणी असल्यामुळे स्वॅब तपासणी थांबली होती. त्यामुळे नव्याने रुग्ण आढळले नाहीत. सोमवारी पुन्हा स्वॅब तपासणी होणार असल्याने हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या 3 हजार 370 जणांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 29 हजार 667 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आता पुन्हा कोरोना संशयितांची तपासणी करण्यात येणार असल्याने येत्या काही दिवसांत आकडा वाढण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.