ख्रि. फ्रासिस रॉड्रिग्स यांना 10 वी श्रद्धांजली
प्रतिनिधी /पणजी
पणजी येथील स्वस्तिक संस्थेतर्फे रविवारी दि. 20 फेब्रुवारी रोजी पाटो – पणजी येथील कला व संस्कृती भवनच्या मल्टिपर्पस हॉलमध्ये दहावे प्रतिध्वनी शास्त्रीय संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन गोव्यातील कॅथोलिक समाजातील हिंदुस्तानी शास्त्रीय व मराठी भक्तीगीत गायक ख्रिस्तवासी फ्रा?सिस रॉड्रिग्स यांच्या स्मृतीस वाहिलेले आहे. हे संमेलन सकाळी 9 वाजता सुरू होणार असून या संमेलनाची “जुगलबंदी’’ ही संकल्पना आहे. या संमेलनात गोव्यातील कलाकार आपल्या कलेद्वारे त्यांना श्रद्धा?जली वाहणार आहेत.
पहिल्या सत्राची सुरूवात संजीवन संगीत अकादमीच्या तरूण गायिका अश्विनी अभ्यंकर व सिया पै या दोघींच्या सहगायनाने होणार आहे. त्यांना तबल्यावर दत्तराज शेटय़? तर संवादिनीवर गोपाळ प्रभू साथ करणार आहेत. तद्न?तर मालू गांवकर (हार्मोनियम) व वसीम खा? (सारंगी) यांची जुगलबंदी होणार आहे. त्यांना तबल्यावर बुद्धेश तळकर साथ करणार आहेत. पहिल्या सत्राची समाप्ती संजीवन संगीत अकादमीच्या विद्यार्थिनी द्रुवी च्यारी व आरती गावडे या दोघांच्या शास्त्रीय सहगायनाने होणार आहे. त्यांना तबल्यावर रूद्राक्ष वझे, संवादिनीवर अनय घाटे तर सारंगीवर संजीवन संगीत अकादमीचे व्याख्याते वसीम खा? साथ करणार आहेत.
संध्याकाळी 4 वाजता छोटय़ाशा औपचारिक कार्यक्रमात फ्रा?सिस रॉड्रिग्स यांच्या मातोश्री क्रिस्तालीन रॉड्रिग्स यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तद्न?तर उत्पल सायनेकर (तबला) व गौरव गावस (पखावज) यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना संवादिनी लेहेरा साथ सुजन सावंत हे करणार आहेत. या संमेलनाची समाप्ती गोमंतकीय गायक डॉ. प्रवीण गावकर व पल्लवी पाटील यांच्या शास्त्रीय सहगायनाने होणार आहे. त्यांना तबल्यावर अमर मोपकर, संवादिनीवर सुभाष फातर्पेकर तर सारंगीवर वसीम खा? साथ करणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेतल गंगानी व नेहा उपाध्ये करणार असून हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.